वाचन प्रेरणा दिन

विद्यार्थी मित्रहो, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या महावीर पॉलीटेक्निक, नाशिक कडून साजरा करण्यात येत आहे. आज भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन संपूर्ण भारतात म्हणून साजरा करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमी करीत असत. वैज्ञानिक असताना त्यांनी १९९६ मध्ये ‘इंडिया २०२०’ हे पुस्तक लिहिले. याच पुस्तकाच्या आधारे देशाच्या तेव्हाच्या नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले.' नकारात्मकतेचे कारण नाही, तुन्ही सर्व काही करू शकता. कारण तुमच्याकडे अलौकिक साहस आहे', हे पटवून देण्याचा डॉ. कलाम यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. त्यासाठी ते कायम मुलांमध्ये रमलेले असत. त्यातूनच त्यांनी' इंडोमिटेबल स्पीरिट' हे पुस्तक लिहिले. त्यांनी एकूण २४ पुस्तके लिहिली असून, त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत. डॉ. कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने किमान एका पुस्तकाचे वाचन विद्यार्थी आणि शिक्षकांनीही करावे असेही अभिप्रेत आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचन छापील पुस्तकाचे अथवा ई-पुस्तकाचे, संकेतस्थळांवरचे वाचनाची सवय लागणे हा महाविद्यालयाचा यामागचा उद्देश आहे. आजच्या दिवशी ग्रंथालयात शिक्षकांसाठी पुस्तक प्रदर्शन तर आयोजित केले आहेतच परंतू लॉकडाऊन मध्ये घरून ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महावीर पॉलिटेक्निकने 'ऑनलाईन वाचन कट्टा ' महावीर पॉलीटेक्निक,नाशिक कडून निर्माण केला आहे. त्याच बरोबर ऑनलाईन ई-जर्नल्स सुद्धा विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे . चला तर मग आनंद लुटुया ऑनलाईन ई-पुस्तकांचा आणि म्हणूया ... ग्रंथ उजळतो मार्ग आपुला फेकूनि किरणे, वाचन म्हणजे प्रियजन संगे विमानातून फिरणे ग्रंथ आपुल्या चिर संस्कृतीचे अमोल भांडार, पुरवगामीचा सागर मानव देई मुक्ताहार, ग्रंथ आपुल्या अंत: सौंदर्याचा ताजमहाल, सत्य शिवाये शाश्वत जणु दीपगृह विशाल ..!!

ऑनलाईन वाचन कट्टा

मराठी साहित्याच्या विविध प्रकारांवरील ऑनलाइन ई-पुस्तकांच्या वेबसाइट्सची यादी
ई-पुस्तकांचे प्रकार वेबसाइट लिंक
कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके Matrubharti
कथा, काव्य, व्यक्तिचित्रण, समीक्षा, नाटके Marathi Sahitya
ऐतिहासिक, आत्मचरित्र, धार्मिक, सामाजिक, ललित साहित्य MarathiPDF
शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, भाषाशास्त्र Libgen (Library Genesis)
कविता, कथा, कादंबऱ्या, आरोग्य, अध्यात्म, पाककृती, शैक्षणिक Parissparsh
ऐतिहासिक, शब्दकोश, बालसाहित्य, विश्वकोश Discover Maharashtra
कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, प्रवासवर्णन, अध्यात्म, बालसाहित्य, ऑडिओबुक्स eSahity
ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक, विविध प्रकारचे साहित्य Internet Archive (Marathi)
विविध प्रकारचे मराठी पीडीएफ पुस्तके ePustakalay
शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक ई-पुस्तके साहित्य मराठी (महाराष्ट्र शासन)