SMES´s Main Site
SMES Polytechnic
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून डिप्लोमा ईन आर्टिफिशील इंटेलिजन्स अँड मशीन लँग्वेज ( ए.आय.एम.एल.) हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रवेशासाठी कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : 9423361398 CONTACT FOR ADMISSIONS - 9423361398

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून डिप्लोमा ईन आर्टिफिशील इंटेलिजन्स अँड मशीन लँग्वेज (ए.आय.एम.एल.) हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रवेशासाठी कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : 9423361398

Contact for any admission asssistance - 9423361398

Students Registration For Admission
  • Click here for details
  • Click here
  • Various College Committee List

  • Click here
  • for Online Staff Leave Application Form

  • Click here
  • Compliant of Defective Bus Services

  • Click here
  • Common Complaint Box

  • Click here
  • Now,our Institute has been registered at National Digital Library of India.Students and Staff can avail & access 12,721,133 of NDL items such as book, articles, theses, manuscripts, audio lectures,video lectures. NDL has been developed a framework of virtual repository of learning resources with a single-window search facility. For more details contact Librarian at Library.

    International Yoga Day has been celebrated at Mahavir Polytechnic.
  • Click here for details

















  •  

       

         वाचन प्रेरणा दिन


    विद्यार्थी मित्रहो, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून श्री महावीर एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या महावीर पॉलीटेक्निक,नाशिक कडून साजरा करण्यात येत आहे. आज भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन संपूर्ण भारतात म्हणून साजरा करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमी करीत असत. वैज्ञानिक असताना त्यांनी १९९६ मध्ये ‘इंडिया २०२०’ हे पुस्तक लिहिले. याच पुस्तकाच्या आधारे देशाच्या तेव्हाच्या नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले.' नकारात्मकतेचे कारण नाही, तुन्ही सर्व काही करू शकता. कारण तुमच्याकडे अलौकिक साहस आहे', हे पटवून देण्याचा डॉ. कलाम यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. त्यासाठी ते कायम मुलांमध्ये रमलेले असत. त्यातूनच त्यांनी' इंडोमिटेबल स्पीरिट' हे पुस्तक लिहिले. त्यांनी एकूण २४ पुस्तके लिहिली असून, त्यातील बहुतांश पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली आहेत. डॉ. कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने किमान एका पुस्तकाचे वाचन विद्यार्थी आणि शिक्षकांनीही करावे असेही अभिप्रेत आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचन छापील पुस्तकाचे अथवा ई-पुस्तकाचे, संकेतस्थळांवरचे वाचनाची सवय लागणे हा महाविद्यालयाचा यामागचा उद्देश आहे. आजच्या दिवशी ग्रंथालयात शिक्षकांसाठी पुस्तक प्रदर्शन तर आयोजित केले आहेतच परंतू लॉकडाऊन मध्ये घरून ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महावीर पॉलिटेक्निकने 'ऑनलाईन वाचन कट्टा ' महावीर पॉलीटेक्निक,नाशिक कडून निर्माण केला आहे. त्याच बरोबर ऑनलाईन ई-जर्नल्स सुद्धा विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे . चला तर मग आनंद लुटुया ऑनलाईन ई-पुस्तकांचा आणि म्हणूया ... ग्रंथ उजळतो मार्ग आपुला फेकूनि किरणे, वाचन म्हणजे प्रियजन संगे विमानातून फिरणे ग्रंथ आपुल्या चिर संस्कृतीचे अमोल भांडार, पुरवगामीचा सागर मानव देई मुक्ताहार, ग्रंथ आपुल्या अंत: सौंदर्याचा ताजमहाल, सत्य शिवाये शाश्वत जणु दीपगृह विशाल ..!!                                                                                                              ग्रंथपाल, महावीर पॉलिटेक्निक,नाशिक

         'ऑनलाईन वाचन कट्टा '

    मराठी साहित्य

    Sr. Online Marathi E Books Publisher Website link
    1 ७०० हुन अधिक मराठी साहित्यातील अजरामर ऑनलाईन मोफत पुस्तकांचा साठा नेटभेट CLICK HERE SEE ONLINE
    2 ६१७ मराठी भाषेतील विविध विषयांवरील मराठी ऑनलाईन मोफत पुस्तके नॅशनल डिजिटल लायब्ररी CLICK HERE SEE ONLINE
    3 मराठी भाषेतील हजारो कथा ,कविता,प्रवास वर्णने, रहस्यमय कादंबरी अशी अनेक पुस्तके PDF स्वरूपात मातृभूमी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड CLICK HERE SEE ONLINE
    4 तुमच्या-आमच्या आवडीच्या कथा,कादंबर्‍या,कविता ... तुमच्या आवडीच्या लेखक-लेखिकांच्या! या ठिकाणी नवनवे साहित्य याठिकाणी प्रसिद्ध करण्यात येते. प्रतिलिपी CLICK HERE SEE ONLINE
    5 मनाला भुलवणाऱ्या कथांचे तसेच सर्वाधिक वाचल्या गेलेल्या साहित्याचे मोफत ऑनलाईन वाचन शक्य रसिक इंटरप्रायझेस CLICK HERE SEE ONLINE

    इंग्रजी साहित्य

    Sr. Online Marathi E Books Publisher Website link
    1 इंग्रजी भाषेतील कथा,कविता,कादंबरी ,प्रवास वर्णने, अशी अनेक पुस्तके PDF स्वरूपात डाउनलोड करता येऊ शकतील मातृभूमी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड CLICK HERE SEE ONLINE

    इतर विषयांवरील ऑनलाईन मोफत पुस्तके

    Sr. Online Marathi E Books Publisher Website link
    1 कृषी, मानववंशशास्त्र, आर्किटेक्चर, खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य, संगणक, पाक, कला,अर्थशास्त्र, शिक्षण, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील मोफत पुस्तकांचा खजिना मातृभूमी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड CLICK HERE SEE ONLINE
    2 Project Gutenberg is an online library of free eBooks.Project Gutenberg was the first provider of free electronic books or eBooks. Gutenberg CLICK HERE SEE ONLINE